बी.सी.ए. भाग -१ मधील प्रवेश प्रक्रियेबाबत.....
विद्यार्थ्यांना BCA प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या CET चा फॉर्म भरण्याची मुदत २० मार्च पर्यंत आहे याची सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी व परीक्षेच्या कामातून वेळ मिळेल तेंव्हा विद्यार्थ्यांनी आपला CET फॉर्म भरून पूर्ण करावा......
तसेच BCA ला प्रवेश घेणारे SC,ST व OBC प्रवर्गाचे सर्व विद्यार्थी तसेच खुल्या (open) प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांच्या आत आहे त्या सर्वांना शासनाची स्कॉलरशिप मिळणार आहे याचीही नोंद घ्यावी.....
ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून CET चा फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी खालील कागदपत्रे घेऊन यावीत....
१. १० वी चे गुणपत्रक
२. जन्मतारखेचा पुरावा
३. ओळखीचा पुरावा (आधार कार्ड इ.)
४. फोटो व सही
५. ईमेल ID
७. १०००/- (खुला वर्ग open category)
तर ८००/- (जात प्रवर्ग caste category)
८. सोबत मोबाईल असावा
तसेच खालील प्रमाणपत्र लागु होत असल्यास घेऊन यावीत
१. जातीचा दाखला
२. EWS प्रमाणपत्र (आर्थिक दृष्ट्या मागास प्रमाणपत्र)
३. अपंग प्रमाणपत्र
४. अनाथ प्रमाणपत्र
महाविद्यालयात BCA विभागात अर्ज विनामूल्य भरून देण्याची सोय उपलब्ध आहे..... विद्यार्थ्यांनी त्वरित संपर्क साधावा.......
अद्यापही ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेले नाही त्यांनी लवकरात लवकर करावे.....
